लोणी काळभोर ता.7 : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विशे कॉम्पोनंट्स कंपनीच्या कामगार संघटनेच्या झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार विकास पॅनलने 11-2 च्या फरकाने बाजी मारली आहे. तर कामगार संघर्ष पॅनलला अवघ्या 2 जागेवर समाधान मानावे लागले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एंजेल हायस्कूलमध्ये कामगार संघटनेची2024-26 ची त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया रविवारी (ता.7) पार पडली. हि निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. किशोर बालीगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक केंद्रावर लोणी काळभोर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
लोणी काळभोर येथील विशे कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही कामगार संघटना कार्यरत आहे. कामगार विकास पॅनलचे चिन्ह पेन होते. तर कामगार संघर्ष पॅनलचे चिन्ह कप बशी होती. विशे कंपनीत 272 पेक्षा जास्त कामगार सभासद आहेत. या निवडणूक प्रक्रियेत दोन्ही संघटनेकडून13 जणांचे अर्ज आले होते. तर एका सभासदाने नशीब अजमवण्यासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. असे एकूण 27 सभासद निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
दरम्यान, या निवडणुकीमध्ये कामगारांनी कामगार विकास पॅनलच्या पारड्यामध्ये मतदान करून कामगार विकास पॅनलला निवडून दिले. कामगार विकास पॅनलने 13 पैकी 11 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर या निवडणुकीत कामगार संघर्ष पॅनलला अवघ्या 2 जागेवर समाधान मानावे लागले आहे. निकालानंतर कामगारांनी गुलाल उधळून, फटाक्यांच्या आतीषबाजीमध्ये विजयोत्सव साजरा केला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
1) कामगार विकास पॅनल (चिन्ह)
किशोर रघुनाथ तांबे, सचिन बळवंत काळभोर, हेमंत बबन कादवाने, सागर दगडूराम काळभोर, सचिन किसन चांदगुडे, चक्रवर्ती उर्फ शंकर तुकाराम मुरकुटे, सचिन भगवान काळभोर, दत्तात्रेय तानाजी डिंबळे, सचिन दत्तात्रेय थोरात, योगेश बाजीराव देसाई, महेश हरिभाऊ सपकाळ
२) कामगार संघर्ष पॅनल (चिन्ह कपबशी)
चंद्रशेखर नारायण देशमुख
अमित वसंत कदम