राहुलकुमार अवचट
Kadethan News : यवत : कडेठाण (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ५२८ मध्ये बेकायदेशीर मातीचे उत्खनन होत असलेल्या ठिकाणी यवत पोलिसांनी मंगळवारी (ता.२३) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी तब्बल ४० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर सहा ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against 6 people for illegal soil mining)
कुरबान जेयनुल अन्सारी (वय – २२), अरषद असगर अन्सारी (वय-२३ दोघेही सध्या रा. वरंवड ,मुळ रा. मलकोको ता. बरही, जि. हजारीबाग राज्य झारखंड), व हायवा ट्रक चालक मंगेश विनायक आमराव (वय-२२ रा.देऊळगाव राजे), धनंजय रावसाहेब टेंगले (रा.वरवंड) दगडु बाळु घुले (रा.नांदुर) व स्वप्नील काटकर ( रा.शिरापुर, ता.दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. (Kadethan News) याप्रकरणी पोलीस नाईक विकास कापरे यांनी सरकारच्या वतीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांची कामगिरी
यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कडेठाण येथे बेकायदेशीर मातीचे उत्खनन होत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. (Kadethan News) मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी मंगळवारी (ता.२३) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा पोलिसांना आरोपी कुरबान अन्सारी, अरषद अन्सारी व मंगेश आमराव हे तिघे जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या मातीचे उत्खनन करून हायवामध्ये भरून वाहतुक करीत असताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अधिक माहिती घेतली असता, आरोपींनी हे काम धनंजय टेंगले (रा.वरवंड) दगडु घुले (रा.नांदुर) व स्वप्नील काटकर ( रा.शिरापुर, ता.दौंड) यांच्या सांगण्यावरून करीत असल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावरही यावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kadethan News)
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत ३० लाख किंमतीचे विना नंबर प्लेटचे दोन जेसीबी व १० लाख रुपये किंमतीचा हायवा ट्रक असा एकूण ४० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kadethan News) पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बंडगर हे करीत आहेत.
दौंड तालुक्यात अनेक दिवसांपासून माती उत्खनन सुरू
दौंड तालुक्यात अनेक दिवसांपासून माती उत्खनन सुरू आहे. वाहनांनी माती वाहतूक केली जात आहे हे कळू नये यासाठी वाहनांवर प्लॅस्टिक कागद टाकण्याची शक्कल देखील वाहतूक करणाऱ्यांकडून लढवली जात आहे. किरकोळ पैशांच्या आमिषाने स्थानिक शेतकरी माती विकण्याचे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. (Kadethan News) भविष्यात या उत्खननामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमदार राहुल कुल यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक
Yavat News : जागतिक परिचारिका दिनानिमित्त यवत येथे परिचारिकांचा सन्मान