लोणी काळभोर, (पुणे) : अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी (ता. 22) होत आहे. या पार्श्वभूमीवर कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मटण, चिकन, मासे विक्री दुकाने, नॉनव्हेज हॉटेल, देशी व विदेशी दारू विक्री बंद ठेवण्यात यावीत, याबाबतच्या सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
प्रभू श्रीराम सोमवारी (ता. 22) अयोध्येत विराजमान होणार आहेत. अयोध्येत राम मंदिराच्या सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा उत्साह प्रत्येकाच्या घरोघरी दिसून येत आहे. त्यामुळेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मटण, चिकन, मासे विक्री दुकाने, नॉनव्हेज हॉटेल, देशी व विदेशी दारू विक्री बंद ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या दिवशी लाडू आणि गोड प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे. गावातील प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.