हनुमंत चिकणे :
Traffic News: लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर हद्दीतील गाडीतळ ते पंधरा नंबर या दरम्यान खाजगी बस (ट्रॅव्हल) मुळे होणारी रात्रीची वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच, उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकातील सततची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना सुरु करण्यात येतील असे आश्वासन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कदमवाकवस्ती येथे दिले. (Immediate measures to solve the continuous traffic jam at Talwadi Chowk in Uruli Kanchan area; Vijay Kumar Magar, Deputy Commissioner of Police, Traffic Branch…)
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन
पुणे-सोलापुर महामार्गावर कवडीपाट टोलनाक्याजवळ उभारण्यात आलेल्या लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (ता. २७) वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजयकुमार मगर यांनी आश्वासन दिले. (Kadamvakwasti News)
यावेळी सहायक पोलीस आयुक्त मौला सय्यद, उद्योजक व कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, भारतीय जनता पक्ष सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, खजिनदार विजय काळभोर, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, भोसरे, पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव, टिळेकर, स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (Kadamvakwasti News)
विजयकुमार मगर म्हणाले, “वाहतूक पोलिस हे वाहतूक नियमनातील एक घटक आहेत, ते शिस्त लावण्याचे काम करतात. मात्र पोलिसांनी कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या व वाहन चालकात येत असलेल्या बेशिस्तपणामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिल वाढतच चाललेली आहे.” वाहतुक शाखेचे यांत्रिकीकरण करून वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला तरीही, त्यास मर्यादा येणार आहेत. (Kadamvakwasti News) त्यासाठी नागरिकांमध्ये स्वयंशिस्त येणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच वाहतुकीची समस्या सुटू शकते, असेही विजयकुमार मगर म्हणाले.
वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल म्हणाले, “पुण्यात वाहनांची संख्या लक्षणीय आहे. पुणे – सोलापूर महामार्ग हा अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे विशेषतः सकाळी व सायंकाळी रहदारीच्यावेळी वाहतुकीची समस्या निर्माण होते. ही समस्या पूर्णपणे संपू शकत नाही तरीही आम्ही पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न करीत आहोत. (Kadamvakwasti News) हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक शाखेच्या पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. ”
पुणे – सोलापूर व नगर महामार्गावर अपघात वाढले ही वस्तुस्थिती…
मागील दोन वर्षाच्या काळात पुणे – सोलापूर व नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. (Kadamvakwasti News) पोलिस यंत्रणा अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करत आहेत. हडपसर हद्दीत गाडीतळ ते पंधरा नंबर या दरम्यान रात्रीच्या वेळी खाजगी बस (ट्रॅव्हल) मुळे मोठ्या प्रमानात वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कार्यरत आहेत. असे विजयकुमार मगर यांनी सांगितले.