लोणी काळभोर, (पुणे) : प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र (बापु) काळभोर यांनी लिहिलेल्या “बापु”ज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता थेऊर फाटा येथील हॉटेल एस फोर जी या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष संदिप बोडके यांनी दिली.
या पुस्तकाचे प्रकाशन पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांच्या हस्ते होणार असुन, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे असणार आहेत. तर दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यावेळी विशेष पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असल्याची माहितीही संदीप बोडके यांनी दिली.
या बैठकीला पुणे प्राईम न्यूजचे मुख्यसंपादक तथा प्रिंट व डिजीटल मीडीया पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, खजिनदार विजय काळभोर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, जेष्ठ सल्लागार प्रभाकर क्षिरसागर, तुळशीराम घुसाळकर, संघटनेचे हवेली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दुडे, तालुका सरचिटणीस अमोल आढागळे, अमोल भोसले, रियाज शेख, हनुमंत चिकणे, विशाल कदम, सुधीर कांबळे, राजेंद्र हाजगुडे, गोरख कामठे आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आजतकचे पत्रकार पंकज खेळकर यांना संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.