पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे स्त्री वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला गडचिरोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 17 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : स्त्री वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता.
– एकूण रिक्त पदे : 17 पदे.
– नोकरीचे ठिकाण : गडचिरोली.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु.60,000/- पर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 01 मार्च 2024.
– मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.zpgadchiroli.in/ वरून माहिती घेता येणार आहे.