बापू मुळीक
सासवड: जिल्हा परिषदेचा माध्यमिक विभाग व जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने राबवलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात जेजुरी (ता. पुरंदर) येथील जिजामाता हायस्कूल ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या अभियानात जिल्ह्यातील 1500 हून अधिक शाळांमधील भौतिक सुविधा, प्रशासन, अध्ययन, अध्यापन गुणवत्ता संवर्धनासाठी केलेले प्रयत्न याची तपासणी करण्यात आली. मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष अरुण थोरात यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यमापन पुस्तिकेच्या आधारे गटशिक्षण अधिकारी तालुका अध्यक्ष सचिव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासणी केली.
शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर व संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी हा निकाल जाहीर केला. विजेत्या शाळेचा 24 एप्रिल रोजी गणेश कला क्रीडा सभागृह पुणे येथे गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती संघाचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी दिली.
निकाल पुढील प्रमाणे:
जिल्हा ग्रामीण 500 पर्यंत विद्यार्थी संख्या
प्रथम- भैरवनाथ विद्यालय दोंदे (ता. खेड). द्वितीय- हुतात्मा उमाजी नाईक हायस्कूल भिवडी( ता. पुरंदर). व न्यू इंग्लिश स्कूल धामारी (ता. शिरूर). तृतीय- श्री भैरवनाथ विद्यालय अवसरी खुर्द (ता. आंबेगाव). व श्री काशिनाथराव खुटवड विद्यालय हातवे बुद्रुक (ता. भोर).
500 ते 1000 पर्यंत विद्यार्थी संख्या:
प्रथम- राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आबोली( ता. मुळशी). व कै. रामराव गेनुजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा मुखई (ता. शिरूर). द्वितीय- शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड (ता. पुरंदर) व अॅड.पु. वा. परांजपे विद्या मंदिर तळेगाव दाभाडे( ता. मावळ). तृतीय- सेट सॅबिस्टीयन हायस्कूल दौंड (ता.दौंड), तोरणा विद्यालय वेल्हे (ता. राजगड). व कर्मयोगी शंकराव पाटील विद्यालय कुरवली (ता. इंदापूर).
1000 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या:
प्रथम- जिजामाता हायस्कूल जेजुरी (ता. पुरंदर). द्वितीय- शारदाबाई पवार माध्यमिक विद्यानिकेतन शारदानगर (ता. बारामती). व महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर (ता. खेड) तृतीय- चैतन्य विद्यालय ओतूर (ता. जुन्नर). व महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन (ता. हवेली).