Pune: चोरीला गेलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता फार कमी असते. वस्तू हरवल्याची फिर्याद दाखल केल्यानंतरही त्या कधी सापडणार याची शाश्वती नसते. 13 जानेवारी रोजी दुपारी इंदौर दौड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या शिरीष विठ्ठलराव शितोळे यांचे 11 लाख 28 हजार 150 रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. शिरीष यांनी पोलिसांकडे धाव घेत लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांनी घटनेचे जवळपास सुमारे 150 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांच्या हालचाली आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सुमितकुमार सतवीरसिंह (वय 30, रा. सुलतानपुरी जि. भवानी, हरियाना) या चोराला अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण:
शिरीष विठ्ठलराव शितोळे ( 73, मध्य प्रदेश) हे इंदौर दौड एक्सप्रेसने प्रवास करत असतांना बॅगा उतरवण्यास मदत करणार्याचा बहाण्याने चोरट्यांनी बॅगेतील 11 लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते. पुणे रेल्वे स्टेशनजवळ आरोपींनी शितोळे जेष्ठ नागरिक असल्यामुळे रेल्वेतून उतरता येत नसल्याने यांना उतरण्यास मदत करतो असे सांगून शितोळे यांच्या हातातील बॅग आरोपीने घेतली. रेल्वेतून उतरल्यानंतरआरोपीने शितोळे यांची बॅग परत केली. दरम्यान बॅगेची चैन उघडल्याचे दिसले. बॅगेतील 11 लाख 28 हजार 150 रुपयांचे सोन्या व चांदीचे दागिनेची पर्स चोरट्यांनी लंपास केली होती. 150 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून दागिने चोरणारा आरोपीला घोरपडी येथून अटक करून त्याच्याकडे असलेले 10 लाख 83 हजार 400 रुपयांचे दागिने फिर्यादीला न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन परत करण्यात आले.पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी बिपीन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुके, पोलीस हवालदार कदम, टेके, दांगट, कांबळे, बिडकर, पोलीस अंमलदार केंद्रे, मधे, केंद्रे, वाघमारे यांनी हि कारवाई करून चोराला पकडून दाम्पत्याला त्याचे हरवलेले दागिने परत मिळवून दिले.