Jejuri News : जेजुरी : अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी (ता. पुरंदर) येथील खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा उद्या सोमवार (ता.२७) पासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना म्हणजे ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे. शी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी गाभारा राहणार बंद
खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून, ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी (Jejuri News) आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. त्या कामाला उद्या सोमवारपासून सुरवात होणार आहे.
दरम्यान, भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत दर्शनासाठी जाता येणार नाही. (Jejuri News) अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी स्पष्ट केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jejuri News : कल्लेदार मिशांच्या मुसाफिराची आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी