Jejuri News : जेजुरी : मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त निवडीविरोधात जेजुरी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी 7 पैकी 6 जेजूरी बाहेरील विश्वस्तांची निवड करण्यात आली. यासाठी स्थानिकांनी हे रास्तारोको आंदोलन केले आहे. विश्वस्त निवडीवरून जेजुरी येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. या निवड करण्यात आलेल्या विश्वस्तांच्या विरोधात जेजुरीतील छत्रपती चौकात हे आंदोलन करण्यात आले. (Jejurikars oppose the new trustees of Martand Devasthan, villagers block road)
रहीवाशी सोडून इतर सर्व विश्वस्तांनी राजीनामे देण्याची मागणी
यावेळी जेजुरी येथील रहीवाशी सोडून इतर सर्व विश्वस्तांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या विश्वस्तांची निवड करताना केवळ एकाच राजकीय पक्षांच्या लोकांची निवड करण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. तर या निवडीत राजकीय दबाव असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. (Jejuri News) या विश्वस्त मंडळात किमान चार विश्वस्त हे स्थानिक असावे अशी मागणी याआधी ग्रामस्थांनी केली होती.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी निषेध व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर श्री मार्तंड देवस्थानच्या मल्हार भक्त निवासासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आले. (Jejuri News) या आंदोलनात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पालखी सोहळा समिती, आजीमाजी विश्वस्त, नगरसेवक व मोठ्या संख्यने ग्रामस्थ सहभागी झाले. त्यांनी निवडीचा निषेध करून देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना निवेदन दिले.
स्थानिक विश्वस्त नसल्यास त्यांना या ठिकाणच्या रुढी परंपरा माहिती नसतात त्यामुळे अनेक अडचणी येतात. (Jejuri News) अनेक निर्णय हे तातडीने घ्यावे लागतात त्यामुळे विश्वस्त हे स्थानिक असावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
A Devotee Drowned In A Dam At Jejuri : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा धरणात बुडून मृत्यू
Jejuri News | एका महिलेचा डोक्यात दगड घालून केला खून : नीरा नजिकच्या थोपटेवाडीतील घटना…
Jejuri News : नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर ; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..!