Jejuri News : जेजुरी : हरिनामाचा जयघोष करत, टाळ मृदांगाच्या गजरात तल्लीन होत वारकरी पंढरीला निघाली आहेत. एक तरी वारी अनुभवावी असे बोलले जाते. त्यानुसार अनेकजण वारीमध्ये सहभागी होत वारीचा आनंद लुटत असतात. मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाच्या ओढीन पायपीट करत असतात. यामध्ये असे काही अवलिया असतात की ते वारी देखील करतात. त्यासोबत एक सामाजिक संदेश सुध्दा देत असतात. (A trip to Alandi to Pandharpur on foot )
सामाजिक विषयावर जनजागृती
यंदा आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावर आज असा एक उंचापुरा, बलदंड देहयष्टी असणारा, एम ए.( समाजशास्त्र ) उच्च शिक्षित, अगदी कानाच्या पाळीपर्यंत पोहोचलेल्या कल्लेदार मिशांचा मुसाफिर आळंदी ते पंढरपूर उलटे पायी चालत वारी करतोय. (Jejuri News) होय, उलटे पायी चालत तो वारी करतोय, त्याचे नाव आहे बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड, ( वय ५५ वर्षे) रा. फुरसुंगी, पुणे. आज त्याने जेजुरी ओलांडून निरेकडे प्रस्थान ठेवलेय. आजची त्यांची ही ४३ वी वारी आहे.
वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, आरोग्य आणि स्वच्छता पाळा, मेरा देश मेरा परिवार या न्यायाने जगा, जगताना मतदान मात्र जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा ते करा. मतदान हा हक्क बजवायला विसरू नका आदी सामाजिक विषयावर जनजागृती करण्यासाठीच ही वारी करीत असल्याचे गुंड सांगतात. देवाची भक्ती करतो,तेवढ्याच मनोभावे भारत मातेची ही भक्ती करण्याची शिकवण आपल्या जनजागृती वारीतून देणाऱ्या (Jejuri News) बापूराव गुंड यांनी आजपर्यंत आपला फुरसुंगी येथील छोटासा कपड्याचा व्यवसाय सांभाळता सांभाळता जनजागृतीसाठी पुणे ते जंतर मंतर दिल्ली अशी २०१७ आणि २०२२ असे दोनवेळा वारी केलेली आहे. मुंबई मंत्रालयापर्यंत ६ वेळा, शिखरी काठ्यांच्या यात्रेत ६ वेळा, यावर्षी नवरात्रात दरवर्षी पुणे ते तुळजापूर अशी वाऱ्या केल्या आहेत.
उलटे चालत वारी करताना त्यांच्या विलक्षण पेहरावा कडे पाहून कुतूहलाने प्रवाशी त्यांच्या संपर्कात येतात. ,बोलतात यातून परिणामकारक जनजागृती होत आहे. या अनेक वाऱ्यातून त्यांनी अपघात का आणि कशामुळे होतात याचे अनेक अनुभव घेतले आहेत. लोकमत च्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे एकच विनंती केली आहे. (Jejuri News) ‘ सरकार, अपघात रोखण्यासाठी रस्त्यांची करोडो रुपये खर्च करून कामे करतात. पण अपघात थांबले नाहीत. शासन अपघात रोखण्यासाठी काम करते की घडवण्यासाठी काम करते. हेच समजत नाही. शासकीय प्रतिनिधींनी खरेच अपघात रोखण्यासाठी काम करीत असतील तर मला जरुर भेटावे. वस्तुस्थिती मी सांगेन असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Jejuri News : जेजुरीकरांच्या आंदोलनाला अखेर यश; अकरा पैकी ६ विश्वस्त स्थानिक असणार
Jejuri News : गडावर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष; लाखो भाविकांनी घेतले खंडोबारायाचे दर्शन
Jejuri News : मार्तंड देवस्थानच्या नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, ग्रामस्थांचा रास्ता रोको