पुणे : Jayant Patil – भाजपचे नेते आणि शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी आज त्यांचे अस्थी कलश दर्शननासाठी ठेवण्यात आले आहे. (Jayant Patil) त्यानिमित्ताने नागरिकांसह राजकीय नेते दर्शनासाठी पुण्यात येत आहे. यावेळी नेत्यांकडून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले जात आहे. (Jayant Patil)
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बापट यांच्या अस्थीचे दर्शन घेवून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बापट साहेबांचे नुकतंच निधन झालं आहे. आम्ही कोणीही अजून पोटनिवडणुकीवर काही विचार केला नाही. बापटसाहेबांबद्दल आम्हाला खूप आपुलकी होती. स्वत: पवारसाहेब सगळे कार्यक्रम रद्द करून पुण्याला आले होते. असे त्यांनी सांगितले.
यावेळी जयंत पाटील यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील म्हणाले, ‘मी अर्थमंत्री असताना अगदी हक्काने येऊन, प्रभागातले प्रश्न आणि समस्या ते माझ्याकडे घेऊन यायचे आणि मला त्यांच्यावर एवढा विश्वस होता की ते योग्यच मुद्दे मांडायचे म्हणून आम्हीही ते प्रश्न सोडवायचो. विधानसभेच्या सदस्यांनी कसे वागावं, काय मर्यादा पाळाव्या आणि कशा पद्धतीने जनतेची सेवा करावी, यांचा आदर्श बापटसाहेबांनी घालून दिला होता. आज ते गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली,’ अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसामनिमित्ताने शहरात फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. त्यावर ”भावी खासदार” असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे जनाची नाही तर मानाची तरी लाज बाळगा अशा स्वरुपाच्या पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायरल करुन संताप व्यक्त करण्यात आला होता.
दरम्यान, बापट यांचे निधन होऊन चारही दिवस झाले नाहीत. तोवर असे फ्लेक लावल्याने नागरिकांनी देखील नारीजी व्यक्त केली होती. यावर मुळीक यांनी फ्लेक्स लावणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत. विनाकारण राजकीय व्देशातून असे करण्यात आले. असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :