शिरुर : येथील बाजारपेठेमध्ये शनिवारी पहाटे दरोडा टाकण्यात आला आहे. ही घटना समोर आली असून श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय बांधले. त्यानंतर तेथील रोकड व दागिने लंपास करण्यात आले. तसेच त्यावेळी सुरक्षारक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन चोरट्यांनी दानपेटीमधील रोकड, पद्मावती देवीचे दागिने चोरून घेऊन गेले आहे. भगवान महावीर जयंतीच्या एक दिवस आधी चोरीचा प्रकार घडल्याने सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोपट सोनबा घनवट (वय ७२, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) हे सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिरूरमधील कापड बाजारात मुख्य रस्त्यालगतच श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. या मंदिरामध्ये घनवट यांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. घनवट हे रात्रपाळी ड्युटीवर होते. ते शनिवारी पहाटे मंदिराच्या मागील बाजूस पहारा देत फिरत होते. त्यावेळी तीन अज्ञात चोरटे मंदिराच्या मागील बाजूने येऊन घनवट यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सुरक्षारक्षकावर हल्ला चढवला. सुरक्षारक्षकास पकडून ठेवण्यात आले.
त्यानंतर मंदिराच्या चाव्या चोरट्यांनी मागून घेतल्या. त्या सुरक्षाकडे चाव्या नसल्याने लोखंडी रॉडने मारहाण केली. एका चोरट्याने त्यांना खाली पाडून धरून ठेवले. दुस-या दोन चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर कोयंडा उचकटून दानपेटी फोडण्यात आली. या दानपेटीमधील रोकड बॅगेत भरुन गाभाऱ्याचा दरवाजा तोडून पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी काढून घेतले.
सर्व माल ताब्यात घेऊन मंदिराच्या मागील बाजूच्या दरवाजामधून चोरटे पसार झाले. थोड्या वेळाने घनवट यांनी दोरीने बांधलेले हातपाय सोडवले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार मंदिराचे पुजारी रमेश पुजारी यांना कळवला. पुजारी यांनी मंदिराच्या विश्वस्तांना दरोड्याची माहिती कळवली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करीत आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली.
सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सहायक निरीक्षक संदीप यादव यांनी घटनास्थळाला भेट दिली. आमदार ॲड. अशोक पवार, जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया यांनीही मंदिराला भेट देत कारवाईची मागणी केली. मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सतीष धाडिवाल, सचिव रमाकांत बोरा, सुभाष शहा, प्रकाश शहा, रमेश कर्नावट, विजय चोपडा, अभय बरमेचा यांनी घटनेचा निषेध केला. येथील देवस्थानेही सुरक्षित राहिली नसल्याबाबत खंत व्यक्त केली जातेय. या शहरातील जैन समाजाच्या नागरिकांनी मंदिर परिसरात जमा झाले. एकत्र येऊन चोरट्यांचा माग काढून त्यांना अटक करण्याची मागणी केले. या घटनेमुळे अनेकजण संतापले आहेत.
त्यावेळे चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज वरून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. नेमकी चोरी कशी केली, एकूणत चोरट्यांचे वर्णन या सर्व गोष्टींवर अभ्यास सुरू असून त्यावरून आरोपींचा माग काढला जाईल. या विषयांतर्गत काही संशयितांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले म्हणाले की, तपासासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.