-गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : बारामतीकरांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. जे बारामतीतील जनतेनी जो विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दाखवला व त्यांना पाठबळ दिले त्याच्या जोरावर पुन्हा विकासाला प्रारंभ झाला. तुम्हा सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी हा आभार दौरा आयोजित केला असल्याचे प्रतिपादन युवा नेते जय पवार यांनी केले.
बारामती तालुक्यातील प्रत्येक गांवामध्ये आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डोर्लेवाडी, झारगडवाडी येथे मतदारांचे आभार मानण्यासाठी युवा नेते जय पवार यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी पवार बोलत होते. यावेळी झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी पवार यांचे भव्य असे स्वागत केले.
यावेळी सरपंच अजित बोरकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन शेडगे, ठेकेदार अंकुश निकम, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मासाळ, रणजीत बोरकर, पोपट कुलाळ, आनंदा मदने, राहुल चव्हाण, संजय जगताप, निलेश कालगावकर, अवि जाधव, दयाराम महाडिक, राहुल कुलाल, श्रीकांत झगडे, ताया शिंदे, नवनाथ धोत्रे, ज्ञानदेव भापकर, रुपेश बोरकर, आबा कालगावकर, राजेंद्र बोरकर, नाना देवकर, गोकुळ साळुंखे, किरण साळुंखे, गोरख बोरकर व आदी मान्यवर व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
यापुढे बोलताना जय पवार म्हणाले, यावेळी येणाऱ्या कालखंडात बारामती, दौंड, इंदापूर, भोर तालुक्यात मी व पार्थ आम्ही दोघे ही काळजीने लक्ष घालून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकात युवकांना प्रोत्साहित करून त्यांना कशा प्रकारे संधी मिळेल हे पाहणार आहे. युवकांचे रोजगारांचे शिक्षणांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पक्ष वाढीसाठी मजबूत प्रयत्न करणार असून कार्यकर्त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना यावेळी येत्या सर्व निवडणुकीत संधी देणार आहोत.
दरम्यान, झारगडवाडी येथे जय पवार यांच्या आभार कार्यक्रमाचे औचित्या साधत येथे युवा नेते जय पवार यांच्या हस्ते 40 लाख रुपये खर्चाच्या 2515 या ग्रामविकास निधीतून ज्ञानदेव भापकर घर ते सुनिल सूळ आणी आवटे वस्ती रस्ता डांबरीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले.