मुंबई : शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३६ वर्षीय अभिलाषा हिने आपल्या पोटच्या १० वर्षीय मुलाचा वायरने गळा आवळून खून केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना मुंबई येथील वांद्रे भागातील खेरवाडी वाय कॉलनीत ९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सर्वेश औटी (वय-१०) असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अभिलाषा औटी ( वय-३६) असे आरोपी आईचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा अभिलाषा यांना त्रास होता. सर्वेशचे वडील हे उप-सचिव म्हणून पदावर कार्यरत आहेत. हा मानसिक आजार रुग्णाला अतिशय आक्रमक किंवा अतिप्रेमळ बनवतो. या घटनेच्या वेळी सर्वेश आणि अभिलाषा घरात एकटेच होते. अभिलाषा यांना राग अनावर झाल्याने सर्वेशला बेडरूममध्ये नेऊन दरवाजा बंद केला. त्यावेळी त्यांनी एका वायरने गळा आवळला.
दरम्यान, त्यावेळी अभिलाषा या मानसिक अवस्थेत होत्या. त्यांनी वायरने गळा आवळल्याने सर्वेशचा जागीच मृत्यू झाला आहे. या आजाराने तिच्या हातून एका भयानक कृत्य घडलं आहे. या घटनेनंतर तिने स्वतःला घरात कोंडून घेतल होते. मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी हे कृत्य केले. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खेरवाडी परिसरातील नागरिक या घटनेने हादरले असून, कुटुंबियांसाठी ही वेळ अत्यंत दु:खद ठरली आहे. अभिलाषा यांना स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा त्रास असल्याने त्यांच्या मानसिक स्थितीत अस्थिरता होती.