पुणे : पुणे शहरात आकाश निरभ्र राहणार असल्यामुळे आणि उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. शहरात सोमवारी १५ जानेवारीला किमान तापमानात ३ अंशांनी घट होऊन ते १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. तसेच पुढील काही दिवसांत थंडीचा पारा आणखी घसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
पुणे शहरात ढगाळ हवामानानंतर आकाश निरभ्र झाले आहे. सकाळी काही प्रमाणात धुकेही पडत आहेत. शहरातील किमान तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील थंड वारे विनाअडथळा येऊ लागल्याने थंडीत वाढ होऊ लागली आहे. रविवारी १४ जानेवारीला किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस इतके होते. त्यात सोमवारी अचानक घट होऊन ते १२.२ अंश सेल्सिअस इतके होते. तर, कमाल तापमानाचा पारा ३२.१ अंश सेल्सिअसवर होता.
उपनगरांतील काही भागात किमान तापमान
एनडीए – १०.६
पाषाण-१०.७
हडपसर-१४.७
कोरेगाव पार्क-१६.७
मगरपट्टा येथे-१७.६
वडगाव शेरी-१९.३ अंश सेल्सिअस