पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मोशी येथे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग सुदैवानं रस्त्यावर पडले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. .
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी वाऱ्यात रस्त्यालगत असलेले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली पार्क केलेल्या दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे. अद्याप हे होर्डिंग अधिकृत आहे, की अनधिकृत हे समजू शकले नाही.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर अवघ्या होर्डिंगचा विषय समोर आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातही अनधिकृत होर्डिंगचे ऑडिट करण्याचे काम सुरू आहे. अशातच आता हि दुसरी घटना घडली आहे.