सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर ता.1: आर्थिक वर्षाचा शेवट होत असताना, राज्यांमधील ग्रामीण भागातील जिल्हा बँका तसेच गाव पातळीवरील कार्यकारी सेवा, सहकारी संस्था, सोसायटीमध्ये, शेतकऱ्यांची पीक कर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. दुसरीकडे लागलीच नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची कागदपत्राची पूर्तता करण्याची धावपळ उडाली आहे. अशातच चालू हंगामातील सातबारा उताऱ्यावरील पीक पाहणी, नोंदणी, अनिवार्य आहे. परंतु यासाठी पीक पाहणी साठी महागडा आयफोन वापरून देखील ते होत नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राज्याच्या कृषी विभागातर्फे खरीप आणि रब्बी हंगामातील पीक पाहणी नोंदणीसाठी गेल्या दोन वर्षापासून ई-पीक पाहणे उपलब्ध करून, देण्यात आले आहे. नव्या पिढीतील शेतकऱ्यांना सरावाने ते वापरण्यास सहज सोपे आहे. परंतु हे ॲप सध्या तरी फक्त अँड्रॉइड प्रणाली आधारित मोबाईल मध्ये उपलब्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे इतर ॲप आय ओ एस प्रणाली आधारित आयफोन मध्ये उपलब्ध असतानाही ई-पीक हे ॲप का काम करत नाही. असा सवाल शेतकऱ्यांचा आहे
ग्रामीण भागातील नवीन पिढीतील अनेक शेतकरी प्रगतिशील बागायतदार, आय ओ एस प्रणाली आधारित आय फोन वापरतात. परंतु ई-पीक ॲप आयओएस प्रणाली आधारित आय फोन मध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना ई-पीक पाहणी करण्यास अडचण निर्माण होते. आज राज्यातील अनेक नव्या पिढीतील अनेक शेतकरी बागायतदार, सहजतेने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. यात ग्रामीण भागात आज आयओएस प्रणाली आधारित आय फोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु पिक पाहणे प्रणाली आधारित आय फोन मध्ये उपलब्ध नसल्याने, ई- पीक पाहणी करता येत असून, देखील आम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. नवनाथ मुळीक, रमेश मुळीक, संदीप ग. मुळीक, नंदू कुटे, नंदकुमार मुळीक, संतोष रा.मुळीक या प्रगतीशील (पिसे ता. पुरंदर) शेतकऱ्यांनी ही माहिती दिली आहे.