सासवड : तालुका विधी सेवा समिती, वकील संघटना सासवड यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी दिवाणी न्यायाधीश ताहेर बिलाल, सह दिवाणी न्यायाधीश एस. के. देशमुख, कनिष्ठ स्तर सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बी. एन. पिलाणे, उपाध्यक्ष ॲड. गणेश उरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतराष्ट्रीय न्याय दिनाचे महत्व आणि गरज याबद्दल माहीती देताना कार्यक्रमाचे वक्ते ॲड. दत्तात्रय फडतरे म्हणाले की, तळागाळातील दुर्बल, अशिक्षित, अज्ञानी, मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुशिक्षित व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
यावेळी सासवड बार असोसिएशनचे ॲड. राहुल कोलते, ॲड. शुभम राऊत ॲड. अक्षय नाझीरकर, ॲड. सतीश राणे विधीज्ञ उपस्थित होते. ॲड. गणेश उरणे यांनी सूत्र संचालन केले, तर राजवर्धन कदम यांनी प्रस्तावना केली. ॲड. ज्योती जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.