राहुलकुमार अवचट
यवत : चौफुला येथील शिवा व्हॅली स्कूल या ठिकाणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे अंतर्गत व रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २०२३-२४ नुकतीच शिवा व्हॅली स्कूल येथील मैदानावर आयोजित करण्यात आल्या होती.
या स्पर्धेत शिवा व्हॅली स्कूलबरोबरच दीपगृह अकॅडमी, जवाहरलाल विद्यालय, मनोरमा हायस्कूल, लर्न अँड प्ले स्कूल, शहीद जवान स्कूल, जिजामाता विद्यालय, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी (१४,१७,१९ वर्षे मुले/ मुली) अशा विविध वयोगटांमध्ये सहभाग नोंदविला होता.
यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांची ११ व १२ डिसेंबर रोजी आंबेगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा अधिकारी महेश चावले, दादासाहेब देवकाते, अमसिद्धा सोलंनकर, दौंड तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक आणि सर्व क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या अशी माहिती क्रीडा शिक्षक व स्पर्धा आयोजक प्रविण होले यांनी दिली.
या सर्व विजेत्या खेळाडूंना शिवा व्हॅली संस्थेच्या अध्यक्षा मंगला सोळंकी, प्राचार्या किरण सिंग, शिक्षक सुनिल पवार, शरद दरेकर, राजश्री जगताप यांसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
१४ वर्षे वयोगट मुली
प्रथम क्रमांक –
- दिव्या नामदेव शिंदे (दत्तकला स्कूल)-(२४ ते २६ कि.)
- ओवी विश्वास जरांडे(शिवा व्हॅली स्कूल)-(२६ ते ३० कि.)
- श्रेया निलेश ताडगे (२९ ते ३२ कि. )
- अनुश्री अमोल शितोळे (शिवा व्हॅली स्कूल)(३२ ते ३५ कि )
- स्वरा नानासाहेब होले (लर्न अँड प्ले स्कूल)(३५ ते ३८ कि)
द्वितीय क्रमांक –
- श्रावणी अभिजीत काळखैरे (शिवा व्हॅली स्कूल),
- जोया हसन शेख (दत्तकला स्कूल)
तृतीय क्रमांक-
- देवयानी अमोल लडकत (शिवा व्हॅली स्कूल),
१४ वर्षे वयोगट मुले
प्रथम क्रमांक –
- अंश निलेश यादव (दीपगृह अकॅडमी) (२३ ते २५ किलो)
- साईराम सुधीर पारखे (२७ ते २९ किलो)
- भवर गंगाराम चौधरी (शिवा व्हॅली) (२९ ते ३२ किलो )
- युवराज पंढरीनाथ पुणेकर (३२ ते ३५ किलो)
- वीर प्रवीण होले (शिवा व्हॅली स्कूल) (३८ ते ४१ किलो)
- प्रणील नवनाथ कांबळे (शहीद जवान हायस्कूल ) ( ४१ किलो वरील वजन गट)
द्वितीय क्रमांक –
- आर्यन भगवान गिरमे (लर्न अँड प्ले स्कूल)
- प्रणय शिवाजी उदागे (शिवा व्हॅली स्कूल)
तृतीय क्रमांक-
- यश परशुराम सोनवणे , प्रणव सतीश काळे (शिवा व्हॅली स्कूल)
१७ वर्ष वयोगट मुली
प्रथम क्रमांक-
- संस्कृती दत्तात्रय गायकवाड (शिवा व्हॅली स्कूल) (३२ ते ३५ किलो वजन गट)
- आर्या रामदास काळभोर (शिवा व्हॅली स्कूल) ( ३५ ते ३८ कि.)
- अनुष्का हनुमंत महापुरे (शिवा व्हॅली स्कूल) (३८ ते ४२ किलो)
- समृद्धी विठ्ठल खळदकर (शिवा व्हॅली स्कूल) (४२ ते ४४ कि)
- सृष्टी पांडुरंग फडके (शिवा व्हॅली स्कूल) ( ४४ ते ४६ किलो)
- अर्पिता बापू पोळ (दत्तकला स्कूल) (४९ ते ५२ किलो)
- कल्याणी विजय राक्षे (शिवा व्हॅली स्कूल) (५२ ते ५५ किलो),
- शर्वरी शरद होळकर (शिवा व्हॅली स्कूल) (५५ ते ५९ किलो)
- रीती गिरीष सुंदरानी (शिवा व्हॅली स्कूल) (५९ ते ६३ किलो)
- सृष्टी रामदास शितोळे (शिवा व्हॅली स्कूल) (६३ ते ६८ किलो)
- अनुराधा शंकर निकम (मनोरमा स्कूल) (६८ किलोवरील गट)
द्वितीय क्रमांक –
- सिद्धी राहुल म्हेत्रे शिवा व्हॅली स्कूल)
- गौरी सुमेरसिंग भोसले( दत्तकला स्कूल)
१७ वर्षे वयोगट मुले
प्रथम क्रमांक –
- हितेश नारायण लाल चौधरी (शिवा व्हॅली स्कूल) (३५ किलो खालील वजन गटात)
- साईराज करणसिंग राजपूत (जवाहरलाल विद्यालय) (५१ ते ५५ किलो)
- ईशान योगेश गुगळे (शिवा व्हॅली स्कूल) (५९ ते ६३ किलो)
- कार्तिक सुधीर जाधव (शिवा व्हॅली स्कूल) (६३ ते ६८ किलो )
- राज हरिभाऊ धुमाळ (दत्त कला स्कूल) (६९ ते ७३ किलो)
- यश सतीश काळे (शिवा व्हॅली) (७८ किलोवरील खुला गट)
१९ वर्षे वयोगट मुली
प्रथम क्रमांक –
- मोनिका प्रशांत तावरे (दत्त कला स्कूल) (४० किलो वजन गट)
- प्रेरणा नितीन भोसले (दत्तकला स्कूल) (५२ ते ५५ किलो वजन गट)
१९ वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक
- अजय दिगंबर तीरेकर (दत्तकला स्कूल) (४५ किलो वजन खालील गट)
३८ किलोवरील खुल्या गट
प्रथम क्रमांक-
- श्रावणी नंदकिशोर पाटील (दत्तकला स्कूल)
द्वितीय क्रमांक –
- जिज्ञासा संतोष हाके (शिवा व्हॅली स्कूल)
तृतीय क्रमांक –
- कशिश कृष्णकांत खळदकर (शिवा व्हॅली स्कूल)