पुणे : “संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्याला देव व्हायचं आहे त्याने संपत्ती आणि दया एकत्र केली पाहिजे”,असंही इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत. नुकत्याच केलेल्या एका भाषणात त्यांनी मला सर्वजण शिव्या देत असल्याचं म्हटलं आहे.
“असा माणूस राहिला नाही की ज्याने मला शिव्या दिल्या नाहीत. माझा एकच गुन्हा आहे की मी फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो. किर्तन काळाची गरज आहे. मी थेट बोलतो म्हणून लोकांना वाईट वाटतं. पण समाज सुधारण्यासाठी हाच पर्याय आहे.” असे इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत.
इंदुरीकर महाराज कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असतात. सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होत असतात. २०२० मध्ये आपल्या कीर्तनात पुत्रप्राप्तीविषयी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच प्रकरणात आता इंदुरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.
दान करायला शिका. पण ज्याला गरज आहे त्यालाच दान करा. सत्कार करा, पण गरिबाचाच करा. श्रीमंताचा सत्कार करून बरगड्या मोडू नये. खाऊन माजलेत त्याला अन्नाची गरज नाही. पण ज्याला गरज आहे त्याला द्या. गायीची केलेली सेवा, तुळशीला घातलेलं पाणी, किर्तनकाराचं घेतलेलं दर्शन, वारकऱ्याला पाजलेला चहा, काळ्या आईची सेवा, सप्ताहाला दिलेला रुपया कधी फेल जात नाही, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.