दीपक खिलारे
Indapur | इंदापूर : इंदापूर शहरात ब्राम्हण सेवा संघाच्यावतीने परशुराम जन्मोत्सवा निमित्त पालखीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाजारपेठेतील गोसावी विठ्ठल मंदिरातुन पालखी व शोभायात्रेचा प्रारंभ करण्यात आला. प्रथेप्रमाणे या पालखीची शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा ची सांगता विठ्ठल मंदिरात झाली.
या ठिकाणी अॅड. विजयराव अजोतीकर यांचे भगवान परशुराम या विषयावर प्रवचन झाले. तर सदाशिव जोशी व विनय देशपांडे यांनी हनुमान चालिसा पठण केले.
दरम्यान विराज बाब्रस यांचा परदेशात उच्च शिक्षण प्राविण्या सह पूर्ण करून लंडन मध्ये मानाची नोकरी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
शोभायात्रे चे नियोजन मिलिंद कौलगी , श्रीधर बाब्रस, प्रसाद कुलकर्णी, डॉ. अमोल उन्हाळे, बाळकृष्ण क्षिरसागर, केदार गोसावी, अनिरुद्ध कुगावकर, मोहन गोसावी, प्रसन्न दुनाखे यांनी उत्कृष्ठ पार पाडले. कार्यक्रमाचे संचलन शिरीष जोशी यांनी व आभार मोहन गोसावी यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News : पुण्यात १२ व्या राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न