धनंजय साळवे
Indian Little Fox : : कवठे येमाई : विहिरीत काहितरी पडल्याचे निर्दशनास आले होते. तत्काळ वनविभागाला बोलावून घेतले गेले. वनकर्मचारी विहिरीत उतरले अन त्याला बाहेर काढले. त्याने मात्र विहीरीतून बाहेर काढल्यावर अंग झटकतच निसर्गात पलायन केले.
विहिरीत पडलेल्या खोकडाला मिळाले जीवदान
शिरूर तालुक्यातील पाबळ येथे एका विहिरीत पडलेल्या इंडियन लिटल फॉक्स अर्थात खोकडाला शिरूर वनपरिक्षेत्रच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले.(Shirur News) त्याला विहिरीतून बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
पाबळ (ता. शिरूर) येथील कल्पेश जयसिंग थोरवे यांच्या शेतातील विहिरीत इंडियन लिटल फॉक्स हा वन्य प्राणी पडला होता. थोरात हे शेतीच्या कामास्तव विहिरीवर गेले असता, त्यांना आपल्या विहिरीत कोल्हा सदृश्य प्राणी पडल्याचे निदर्शनास आले. (Shirur News) त्यांना त्या प्राण्याला बाहेर काढण्यात यश आले नाही, त्यामुळे त्यांनी याबाबत तात्काळ शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयात याबाबत माहिती दिली.
त्यानंतर शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीमंडळ अधिकारी गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड व वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. (Shirur News) त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने हनुमंत कारकुड हे स्वतः विहिरीत खाली उतरून खोकडाला यशस्वीरित्या व सुखरूपपणे बाहेर काढले व त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
वनविभागाला यासाठी सरपंच सचिन वाबळे, मेजर सुनील चौधरी, नवनाथ थोरवे, मुरलीधर जाधव, बाळासाहेब जाधव, दीपक घोडेकर, ह.भ.प. एकनाथ पिंगळे, योगेश कडलक, माणिकराव चौधरी यांची मदत मिळाली. तर या कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी वन खात्याच्या अधिकारी व कामगारांचे अभिनंदन करून कौतुक केले.
खोकड हा प्राणी शक्यतो संध्याकाळच्या नंतर भक्षाच्या शोधात बाहेर पडत असतो. अंधार पडल्यानंतर तो जोरात ओरडत असतो, लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे, कीटक, उंदीर हे त्याचे खाद्य आहे. तसेच शेतातील कलिंगड, बोरे, हरभऱ्याचे घाटे देखील तो खात असतो. (Shirur News) याच्या मागे एखादा वन्य प्राणी लागला असल्यामुळे तो विहिरीत पडला असावा. असे वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : सुल्झर इंडिया कंपनीतील सुरक्षारक्षकानेच २७ लाखाच्या साहित्यावर मारला डल्ला
Shirur News : टाकळी हाजी – फाकटे रस्त्यावरील पुलाला कठडे बसविण्याची मागणी