केडगाव: प्रत्येक भारतीयाने भारताला 2047 पर्यंत विकसित बनवण्याचा संकल्प केला पाहिजे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन असल्याचे खासदार कविता पाटीदार यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील यवत येथे विकसित संकल्प यात्रा व लाभार्थी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशाप्रकारे प्रत्येकापर्यंत लाभ पोहोचवण्याचे सर्वांनी प्रमाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचा विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश आहे. तसेच महाराष्ट्रातील लोक राज्यभरात मोठ्या प्रमाणात विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कविता पाटीदार यांच्याकडून आमदार कुल यांचे कौतुक
या विकसित संकल्प यात्रा व लाभार्थी मेळाव्यादरम्यान खासदार कविता पाटीदार म्हणाल्या की, दौंडचे आमदार राहुल कुल हे खूप चांगले काम करत असून, त्यांनी दौंड तालुक्यातील कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेपर्यंत या योजनेचा लाभ पोहचवण्याचे काम चांगल्या पद्धतीने केले असल्याचे दिसत आहे.
प्रत्येक गावातील कार्यकर्तेही करताहेत काम
यावेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, या योजनेचा फायदा कसा जनसामान्यपर्यंत पोहचविता येईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असून, प्रत्येक गावातील आमचे कार्यकर्तेही यामध्ये झोकून देऊन काम करत आहे.
या कार्यक्रमावेळी महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष कांचन कुल, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राहुल शेवाळे, सरचिटणीस आकाश कांबळे, दौंड तालुका समन्वयक आप्पासाहेब दिवेकर, जिल्हा समन्वयक सोमनाथ कणसे, पंचायत राज प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप व ग्रामविकास नवनाथ पडळकर, प्रभारी बारामती लोकसभा संचालक विकास शेलार, आप्पासाहेब हांडाळ, किरण देशमुख आदीसह दौंड तालुक्यातील असंख्य लाभार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौंड भाजप तालुकाध्यक्ष ऍड. हरिश्चंद्र ठोंबरे यांनी केले तर सूत्रसंचालन दौंड भाजप सरचिटणीस उमेश देवकर यांनी केले.