पुणे : लग्न समारंभ तसेच इतर अनेक घरगुती कार्यक्रमांमध्ये मेहुणीची छेड काढून, अश्लील बोलून व एसएमएस करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी हिंगोली येथे राहणाऱ्या आरोपी मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे.
छेडछाडीचा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते ७ फेब्रुवारी या दरम्यान पीडित महिलेच्या राहत्या घरी तसेच लग्न समारंभ व इतर कार्यक्रमादरम्यान घडला. याबाबत ३७ वर्षीय महिलेने बुधवारी (ता. २७) विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मेहुणा आहे. आरोपीने फेब्रुवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत लग्न समारंभ व इतर कार्य़क्रमात अश्लील बोलून व एसएमएस करुन मेहुणीचा विनयभंग केला. अनेकदा मेहुणीच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तडक हिंगोली येथे राहणाऱ्या आरोपी मेहुण्यावर गुन्हा दाखल केला आहे.