इंदापूर : इंदापूर शहरातील शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तीन कॅफेंवर इंदापूर पोलिसांनी छापा टाकला आहे. याप्रकरणी कॅफेचा मालक व कॅफेत आढळून आलेल्या आठ जणांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांमधून कौतुक होत आहे.