दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (ता. १८) इंदापूर दौऱ्यावर असताना वरकुटे बुद्रुक येथे मांसाहार करून तेथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सभा घेऊन अभिषेक केल्याची निंदनीय घटना घडली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे पाईक असणाऱ्या वारकरी सांप्रदाय आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. असे मत भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड शरद जामदार यांनी व्यक्त केले. (Warkari Sampradaya is upset because of MP Supriya Sule’s “that” act – BJP’s taluka president Ad. Sharad Jamdar)
भाजपच्या वतीने घटनेचा निषेध
खा. सुप्रिया सुळे ह्या गुरुवारी (दि. १८) इंदापूर दौऱ्यावर असताना वरकुटे बुद्रुक येथील सदर घडलेल्या घटनेची खातरजमा केली असता सदर प्रकार घडल्याची माहिती समोर आली. (Indapur News) संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांकडून हे निंदनीय असे कृत्य झालेले आहे. भाजपच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करीत असल्याचे अँड. जामदार यांनी सांगितले आहे.
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदू धार्मियांच्या भावना दुखविण्याचे काम वेळोवेळी केले आहे. असेही जामदार यांनी सांगितले आहे. (Indapur News) समस्त वारकरी संप्रदाय हा विठ्ठल रुक्मिणीची भक्ती करतात, त्यांच्या धार्मिक भावना या घटनेमुळे दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे खासदार सुळे यांनी या घटनेबाबत वारकरी सांप्रदाय आणि हिंदू समाजाची माफी मागावी असे अँड. शरद जामदार यांनी सांगितले.
दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांच्या हातून यापुढे हिंदू धर्मांच्या भावना दुखावण्याचे असे कृत्य पुन्हा घडू नये. अशी सुदबुद्धी त्यांना मिळावी. असे अँड. शरद जामदार म्हणाले. (Indapur News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूर-बारामती रास्ता रोको ! उड्डाणपुलाच्या मागणीसाठी गोखळीकरांनी रस्ता रोखला.