Indapur News : इंदापूर, (पुणे) : शहा (ता. इंदापुर) गावच्या ग्रामपंचायत हद्दीतील महादेवनगर परिसरात तीन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारून २ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (ता. १३) सकाळी हि घटना उघडकीस आली आहे.
अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदीपान भगवान खबाले (रा. शहा महादेवनगर ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. (Indapur News) तसेच परिसरातील नामदेव शिवदास खबाले, जितेंद्र लाला जाधव यांची घरफोडी झाल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपान खबाले यांची गावात व रानात अशी दोन ठिकाणी घरे आहेत. शुक्रवारी रात्री गावातील घरात जेवण करुन ते आपल्या पत्नीसह रानातील घरी आले होते. (Indapur News) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अजिंक्य खबाले याने रानातील घरी येऊन, गावातील घरात चोरी झाली असल्याचे सांगितले.
घरी जाऊन पाहणी केली असता घरातील रोख रक्कम, दागिने चोरीस गेल्याचे आढळले. या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आल्यानंतर नामदेव शिवदास खबाले यांचे देवघरातील पेटी व त्यामधील १० हजार रुपयांची रोकड, जितेंद्र लाला जाधव यांचे घराच्या हॉलमधील साडया व कपडे चोरीस गेल्याचे फिर्यादीस चोरून नेहले आहे. (Indapur News) याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.