दीपक खिलारे
Indapur News | इंदापूर : कांदा अनुदानासाठी कांदा उत्पादकांनी दि.20 एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जे.पी. गावडे यांनी केले आहे. सदरचे अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर कार्यालयात निशुल्क मिळणार आहेत.
बाजार समितीमध्ये 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीत इंदापूर बाजार समिती मार्केटमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना 350 रुपये प्रती क्विंटल प्रमाणे अनुदान जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणे शासनाने कांदा विक्री अनुदान मंजूर केले असल्याचे गावडे यांनी सांगितले.
ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये लाल कांदा विक्री केलेला असेल तर कांदा विक्रीची मूळ प्रत, खरीप हंगामातील कांदा पिक पेरा नोंद असलेला 7/12 उतारा व शेतकऱ्यांचे ज्या बँकेत खाते आहे. त्या बँक खात्याच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड झेरॉक्स व अर्जासोबत 20 एप्रिल पूर्वी कार्यालयात सादर करावेत असे प्रशासक जे.पी. गावडे यांनी सांगितले.