दीपक खिलारे
Indapur News | इंदापूर : जिल्हा नियोजन मंडळाची अलीकडे बैठक झालेली नाही. त्यामुळे काही विकास कामांना मंजुरी मिळालेलीच नाही. मात्र तरीही इंदापूरचे आमदार विविध मागण्या केल्याचे फक्त पत्र दाखवून 3 कोटी रक्कमेची कामे मंजूर केल्याचे श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. तसेच जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव घेता भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी केला.
विकास कामे शिवसेना-भाजपचे युती सरकार मंजूर करणार व निधी देणार आहे. आता महाविकास आघाडीची सत्ता नसल्याने इंदापूरच्या आमदारांनी शिवसेना-भाजप सरकारच्या कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये. असाही टोला अँड. जामदार यांनी भरणे यांना लगावला.
फुकटचे श्रेय घेणे आमदारांनी बंद करावे…
उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांतदादा पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकार हे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विकास कामांना मंजुरी देते. त्यामुळे फक्त मागणी केल्याचे पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल करून व बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करून, फुकटचे श्रेय घेणे आमदारांनी आता बंद करावे. असा सल्लाही भरणे यांना त्यांनी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Indapur News : गलांडवाडी नं. २ येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राची स्थापना
Indapur News | आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ; भाजपा युवा मोर्चाची मागणी