दीपक खिलारे
Indapur News | इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सभेला गुंडांची सभा असे आक्षेपार्ह, असंविधानिक विधान केले होते. या वक्तव्याचा निषेध व्यक्त करून आमदार भरणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दीपक काटे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपची सभा ही गुंडाची सभा…
इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथील सभेत बोलताना भाजप च्या २६ मार्च च्या सभेवर बुधवारी (ता.२९, मार्च) टीका केली.यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले कि, भाजप ची सभा ही गुंडाची सभा होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत समाचार घेत आमचा पक्ष गुंडांचा वाटतो तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरांचा, कमिशनवाल्यांचा का असा पलटवार दीपक काटे यांनी केला.
भाजपच्या सभेत उपस्थितांनी भाषणाला टाळ्या वाजवणे हा काय इंदापूरकरांचा गुन्हा आहे का? असा सवाल करीत आम्ही मांडलेले मुद्दे लोकांना पटल्यानेच त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. भाजपचे आमदार तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो
बॅनर वर टाकून स्वतःची जाहिरात करायचा केविलवाणा प्रयत्न आमदार भरणे यांनी केला आहे. तसेच आ. चंद्रकांत पाटील यांचा फोटो न विचारता चोरून लावला. याच्यातूनच त्यांच्या पक्षाची संस्कृती जनतेसमोर आल्याचे दीपक काटे यांनी सांगितले.
दरम्यान, धर्माचे रक्षण करणे ही गुंडगिरी असेल तसेच गोहत्या थांबावी. म्हणून प्रयत्न करणे ही जर गुंडागिरी असेल तर ही गुंडगिरी आम्ही स्वाभिमानाने करू. तसेच आ. भरणे यांनी तात्काळ त्यांचे विधान माघारी घ्यावे. अन्यथा त्यांना या अपमानाचे परिणाम भोगावे लागतील असे सांगून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही दीपक काटे यांनी यावेळी दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Yavat News | यवत येथील इंदिरानगरमध्ये रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मिरवणूक
Yavat News : यवत येथील प्रसिद्ध व्यापारी संजय शहा यांना मातृशोक