Indapur News : इंदापूर : इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला विविध आमिषे दाखवून त्याच्याकडून तब्बल १ कोटी १३ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पैसे दिल्याच्या बदल्यात चांगला परतावा मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्याने आपल्या मालकीच्या शेताचीही विक्री करून संबंधितांना पैसे दिले. पैसे मिळताच आरोपींनी फोन बंद केले. त्यानंतर मात्र, तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले… अशी शेतकऱ्याची स्थिती झाली आहे. शेतकऱ्याने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली असून, बारामती पोलिसांनी या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
चौघांवर गुन्हा दाखल
पुणे येथील रहिवासी असणाऱ्या रफिक तांबोळी याच्याशी २०१४ ते २०१६ च्या दरम्यान राजेंद्र बापूराव शेलार यांची ओळख झाली. गोड बोलून तांबोळी याने शेलार यांना घोळात घेतले. आपला आळंदी येथे वादातील प्लॉट असून, हा प्लॉट विकल्यानंतर मला ५० कोटी रुपये मिळतील. त्यातील ४ कोटी रुपये मी तुम्हाला देईन, असे आश्वासन देऊन त्याच्याकडून सध्या वापरासाठी म्हणून १ लाख रुपये घेतले. त्यानंतर १५ दिवसांनी तांबोळी याने पुन्हा २ लाख रुपयांची मागणी केली. (Indapur News) ४ कोटी देण्याच्या आमिषाने एकूण १२ ते १७ लाख रुपये त्यांच्या आणि त्याची पत्नी आतिया यांच्या खात्यावर शेलार यांना जमा करायला लावले.
दरम्यान, रफिक याचा शोध पोलीस घेत होते. या दरम्यान, सिराज शेख (रा. पुणे), उमेश उमापुरे (रा. कासारशिरसी, ता. लातूर) आणि धनाजी पाटील (रा. सांगली) हे राजेंद्र शेलार यांना भेटले. या तिघांनी आणि तांबोळी यांनी मिळून काशाच्या भांड्यांची माहिती राजेंद्र शेलार यांना दिली. ही भांडी २५० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगत, नासा आणि ईस्त्रो ही भांडी २०० ते ३०० कोटी रुपयांत विकत घेतात, असा बनाव केला. या भांड्यांध्ये वीज पडून इलेक्ट्रीक पॉवर तयार केली जाते. (Indapur News) यामुळे यांना प्रचंड मागणी असल्याचे सांगितले. शिवाय भांड्यांच्या पडताळणीसाठी ९० लाख रुपयांची मागणी केली.
दरम्यान, शेलार यांनी हे सत्य मानून, सणसर येथील स्वतःच्या मालकीची ९० गुंठे जमीन विकली आणि त्यांना ९० लाख रुपये दिले. १ कोटी १३ लाख रुपये घेऊन हे ठग पसार झाले. काही दिवसांनी चौघांनीही फोन बंद केले. (Indapur News) आपली घोर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Indapur News : दुर्दैवी घटना..! इंदापूर तालुक्यातील लाकडीत माय-लेकीचा विहिरीमध्ये पडून मृत्यू..