Indapur News : भिगवण : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व इंदापूर तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम तक्रारवाडी गावात पार पडली.
महिलांची उपस्थिती लक्षणीय
या कार्यक्रमाला तक्रारवाडी गावातील महिलांची उपस्थिती ही लक्षणीय ठरली. या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, तक्रारवाडी गाव हे नेहमी एकसंघ गाव म्हणून आमच्या पाठीशी उभे राहिले आहे. (Indapur News) ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन अडीच वर्षाच्या कालावधीने विखुरलेले सूर पुन्हा एकत्र जुळून आले आहेत. त्यामुळे तक्रारवाडीची तक्रार आता निघून गेली असून आता विकासाची वाडी निर्माण झाली आहे. आपल्या विचारांचा सरपंच आता ग्रामपंचायतीच्या खुर्चीवर बसला आहे म्हणून गावात विकासाचे चैतन्य निर्माण झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त तक्रारवाडी गावात मंजूर झालेली २ कोटी ७५ लाखाची जी दोन विकासकामे आहेत. ती स्पेशल केस म्हणून मंजूर झाली आहेत.
दरम्यान, तक्रारवाडी गावचे ग्रामदैवत पिरसाहेब महाराज चरणी महाराष्ट्रात धो-धो पाऊस पडो ही पार्थनाही केली. यावेळी पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर घडलेला पाऊसाचा किस्सा सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात आपलं सरकार गेले एक वर्षापासून दोन इंजिनच सरकत होतं पण आता एक तिसरे इंजिन आपनाला येऊन मिळाले आहे. (Indapur News) त्यामुळे तीन इंजिनच बळ आता आपणाला मिळाले आहे. २०२४ ची काळजी कुणी करू नका. जनतेचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी आहे. कोणतंही संकट आलं तर ते प्रेमाने स्वीकारायचे. अडचणी आल्या तरीही हार मानायची नाही. यश मिळालं तर हुरळून जायचं नाही अशी शिकवण कर्मयोगी शंकरराव पाटील यांची आहे.
राशीन-बारामती ह्या महामार्गाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे.या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे ज्या मच्छी विक्रेत्यांवर आभाळ कोसळले आहे.(Indapur News) त्यांना ही न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे काम ही अंतिम टप्प्याने आले असून या पोलीस ठाण्याचे ही उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेणार असून लवकरच या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. (Indapur News) ‛आयुषमान भारत’ या आरोग्य योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे मनोगत संगीता वाघ यांनी तर प्रास्ताविक भाषण माजी उपसरपंच प्रशांत वाघ यांनी केली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश अंकुश वाघ यांनी केले. यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमीपूजन केलेल्या विकास कामांची यादी :
१) राष्ट्रीय पेयजल योजना (हर घर जल) (१ कोटी ५० लाख)
२) तक्रारवाडी गावठाणकडे पासून ते थाडेश्वर मंदीर (१ कोटी २० लाख)
३) भिगवण – राशिन रोड शहाजी वाघ ते फिल्टर पाणी योजना पर्यंत (५६ लाख)
४) संतोष अशोक वाघ घर से रणजीत जगदाळे घरापर्यंत (१० लाख रुपये)
५) राहुल सावंत घर ते संपतराव वाघ यांचे घरापर्यंत (७ लाख रुपये)
६) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पत्रा शेड व सुशोभिकरण (५ लाख)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : भिगवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रणजित भोंगळे तर सचिव पदी प्रदीप ताटे यांची निवड