दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंदापूर शहरासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रम व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना (जिल्हास्तर) अंतर्गत मंजूर केलेल्या 13 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 18) करण्यात आले. या विकासकामांतर्गत महाराष्ट्रातील पहिले सर्वात मोठे योगभवन इंदापूरमध्ये होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली (Indapur News) इंदापूर शहर परिसरात विविध विकास कामे मंजूर करण्यात आली असून, या सर्व कामांचा शुभारंभ इंदापूर शहरवासीयांच्या उपस्थितीमध्ये झाला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाईक रॅली
इंदापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाईक रॅली काढून शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बाईक रॅलीत सहभागी झाले होते. (Indapur News) अनेक युवक कार्यकर्ते आपल्या दुचाकीवर हर्षवर्धन पाटील यांना बसवून शहरातील विविध विकासकामांच्या ठिकाणी घेऊन जात होते.
या विकासकामांमध्ये तहसील कार्यालय ते इजगुडे पंपपर्यंत रस्ता, नॅशनल हायवे बुलेट शोरुम ते डॉ. रुपनगर हॉस्पिटल ड्रेनेज
व रस्ता, शंभर फुटी रोड प्रशासकीय भवनशेजारी इंदापूर योगभवनसह इतर अनेक विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या सर्व कामांचा शुभारंभ करण्यात आला. (Indapur News) अनेक मान्यवरांनी यावेळी आपल्या मनोगतात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, इंदापूर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, दत्तात्रय अनपट, इंदापूर अर्बन बँकेचे नूतन संचालक स्वप्नील सावंत, दादा पिसे, बबन शेटे, सागर गानबोटे, ललेंद्र शिंदे, संतोष शिंदे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक कैलास कदम यांनी केले तर आभार प्रा. सुनिल सावंत यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : मृत चित्रबलाक पक्षांना इंदापूरकरांनी वाहिली श्रद्धांजली
Indapur News : इंदापूरच्या आमदारांनी विकासकामांचे श्रेय घेण्याची सवय बंद करावी; अँड. शरद जामदार