दीपक खिलारे
(Indapur News) इंदापूर : शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर( Indapur) तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत, त्यांच्यामध्ये तेवढी धमकही आहे. त्यामुळे आमदारांनी आता तालुक्याच्या विकासाची चिंता करू नये. आता विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे आमदार भरणे यांनी निवांतपणे विश्रांती घ्यावी, असा टोला भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जमदार यांनी लगावला.
मी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सक्षम आहे, विरोधकांनी त्याची चिंता करू नये, असा दावा आमदार भरणे यांनी केला. त्यास भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. जामदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
विरोधी पक्षाच्या आमदाराला शासन दरबारी किती किंमत असते हे जनतेला माहित आहे, त्यामुळे आमदार भरणे यांनी आता निवांत घरी बसून विश्रांती घ्यावी, असा सल्ला इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मी तालुक्याच्या विकासासाठी सक्षम आहे, अशा बाता मारणाऱ्या इंदापूरच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालुक्यातील किती प्रश्न मार्गी लावले, हे जनतेला सांगावे, असे आव्हान ॲड. शरद जामदार यांनी दिले.
राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार हे गतिमान सरकार…
राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार हे गतिमान सरकार असून हे सरकार इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्यास कटीबद्ध आहे. शिवसेना भाजप युती सरकारने तावशी येथील नीरा नदीवरील पुलासाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याचे ॲड. शरद जामदार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
बुरा ना मानो होली है..!भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली रंगांची उधळण
माजी आमदार घोलप यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे काम : हर्षवर्धन पाटील