दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुका बार असोसिएशनच्या वतीने इंदापूर न्यायालय येथे गुरुवारी (ता. १२) ॲड. सचिन झालटे-पाटील यांचे मृत्यूपूर्व जबाब व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार या विषयांवर व्याख्यान संपन्न झाले. अशी माहिती इंदापूर तालुका बार असोसिएशनचे सचिव ॲड. आशुतोष भोसले यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड .मनोहर चौधरी उपस्थित होते.
ॲड. सचिन झालटे-पाटील यांनी मृत्यूपूर्व जबाब व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच रंजक उदाहरणे देत सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. या कार्यक्रमाला इंदापूर तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुभाष भोंग व ॲड. जमीर मुलाणी, ॲड. रुद्राक्ष मेनसे यांचेसह वकील बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.