पुणे : कोरोना अलर्टच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पुण्यात सहा दिवसात ६ हजार नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. जगभरातील अनेक देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने पुण्यात बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
पुणे शहरात (१४ ते २) डिसेंबरपर्यंत अवघ्या २०६ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला होता. गेल्या आठवड्यापासून बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या चांगलीच वाढली आहे.( २१ ते २७) डिसेंबर या कालावधीत ६ हजार ७२३ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला. मागील अनेक दिवसांपासून पुणेकरांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात आले होते.
मागील काही महिन्यात पुणेकरांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अनेक देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसला. पुण्यात गुरुवारी (ता.२९) सिंगापूरहून आलेल्या ३२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही चिंता करण्याची गरज नाही तर काळजी घेण्याची गरज आहे, असे मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी