पुणे : लहानपणी फार मस्तीखोर, बंडखोर होतो, पण अभ्यास न करता देखील शाळेत हुशार होतो. तर चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा माजी मंत्री विजय शिवातरे यांनी केला आहे. मंत्री विजय शिवातरे सासवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
चौथीत असताना जनावरं वळायला जायचो, त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की, चक्कर येऊन पडायचो, असा खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवातरे यांनी सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले विजय शिवतारे?
माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, “लहानपणी मी खूप वांड होतो. प्रचंड बंडखोर, चौथीत बिड्या प्यायचो , तुम्हाला कुणाला विश्वास बसेल का? गुरं वळायला जायचं, गुरं सोडायची, चालत हरकुळला जायचं, आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे, बिडीचं बंडल आणायचं, दोन-चार बिड्या प्यायलो की, चक्कर येऊन पडायचो. असा बंडखोर प्रवृत्तीचा मी होतो. पण एक होतं. असताना सुद्धा मी पहिल्या क्रमांकावर होतो. मी कधीही अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आताही शाळेत गेलात, तर माझं नाव आहे तिथे. माझा हजेरी क्रमांकही असा होता ना. एक दिवस मी डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो. जो हजेरी क्रमांक कधीही बदलत नाही.”