लोणी काळभोर, (पुणे) : येथील रामा कृषी रसायन लोणी काळभोर कंपनीतील कामगार व व्यवस्थापनमध्ये २१ डिसेंबर २०२१ ते २०२४ या तीन वर्षासाठी १३ हजार १०१ रुपयांची वेतनवाढ जाहीर करण्यात आल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापक व्ही. के. पांडे यांनी दिली.
यावेळी व्यवस्थापनाच्या वतीने व्ही के पांडे जनरल मॅनेजर, आर एन शर्मा पर्सनल मॅनेजर, युनियन च्या वतीने अध्यक्ष- आर बी काळभोर, सरचिटणीस- आर आर उरमोडे, उपाध्यक्ष- जी जी जाधव, उपाध्यक्ष-श्री ए के गरगडे, सहचिटणीस- एन के पडघने, सहचिटणीस – जी एन चीतोले, खजिनदार-श्री जे बी धुमाळ, इंटरनल ऑडिटर-श्री आर बी खैरे आदि उपस्थित होते.