Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ‘सत्तारचे करायचे काय…, ’50 खोके, एकदम ओके’च्या घोषणा ऐकताच मंत्री अब्दुल सत्तारांनी तावातावात सोडले सभागृह..; पहा व्हिडीओ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 3 October 2024, 19:51

पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या अनुषंगाने सातारचे पक्ष कंबर कसून मैदानात उतरले असून सभा गाजवल्या जात आहेत. अशातच पुण्यामधून एक बातमी समोर येत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर ’50 ओक्के एकदम ओक्के’ अशी घोषणा विरोधकांनी द्यायला सुरवात केली होती. त्यातच पुण्यामध्ये 50 खोक्के, एकदम ओक्के असे म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांना डिवचण्यात आलं आहे. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि.माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले होते.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी पुण्यातील निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने येथील परिषदेत चर्चा करण्यात येणार होती. या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यात 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणा; अब्दुल सत्तारांनी सभागृहातून घेतला काढता पाय #AbdulSattar #pune #Sattar pic.twitter.com/WIPAlW0MZS

— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) October 3, 2024


यावेळी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते.

राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तसेच, तेथे आल्यानंतर त्यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका, असे म्हटले. तसेच, मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. मात्र, यावेळी बाजारसमितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करायला सुरवात केली. घोषणाबाजी करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला. येथील नाट्यगृहात पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53

नागपूर हादरलं! ऑनलाईन गेमचा नाद बेतला तरुणाच्या जीवावर

Wednesday, 21 May 2025, 22:41

रायगडात भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, 2 चालकांसह वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी

Wednesday, 21 May 2025, 21:40

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

Wednesday, 21 May 2025, 21:19

पुण्यात विकृतीचा कळस ; टीव्ही पाहायला येणाऱ्या तरुणीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Wednesday, 21 May 2025, 20:16

थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात अनोळखी माळकऱ्याचा मृत्यू ; पिशवीत सापडली सुमारे 2 लाख 40 हजारांची रोकड

Wednesday, 21 May 2025, 19:59
Next Post
MPSC announced rajyaseva pre exam result

शेतकऱ्याचा पोरगा साहेब झाला; पुरंदरमधील आशिष खेनट लोकसेवा परीक्षेत १५व्या रँकने उत्तीर्ण, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर मिळवले यश

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.