युनूस तांबोळी
शिरूर : मराठी अभ्यासक्रमील मुले शैक्षणिक प्रगतीमध्ये कुठेही कमी नाही. एकदा तरी मृत्युंजय, राजा शिवछत्रपती, राधेय, ज्ञानेश्वरी,अमृतवेल, साने गुरुजींच्या गोष्टी वाचा आणि समृद्ध व्हा. आपली मराठी सातासमुद्रापार नेण्याचे काम महाराष्ट्रातील तमाम लेखक,
कवी,नाटककार, इतिहासकार यांनी केलेले आहे.अशा मराठी ज्ञानवंतास अभिवादन करून मराठीला समृद्ध करा, असे आवाहन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले.
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे मा.बापूसाहेब गावडे माध्य-उच्च माध्य विद्यालय, टाकळी हाजी येथे “मराठी भाषा गौरव दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी राजभाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय शिरूर येथील पथक क्र.१ चे डॉ. सचिन शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितीत होते.याप्रसंगी “शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत ३४ मुलांना जातीच्या दाखल्याचे वाटप प्राचार्य आर. बी. गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन संभाजी गावडे, रोहीदास मांजरे, भारती चाटे, महिंद्र गायकवाड, ज्ञानेश्वर निचित,दौलत सोनवणे, राहुल गावडे, नाथा पठारे, कैलास वाघमारे, आशा मोहरे, पानमंद मॅडम, अण्णा जाधव,संजय वाघमारे, महादेव गावडे, लक्ष्मण सोदक, कोंडीभाऊ चौधरी, प्रसाद मुळे, गजानन मुंजाळ, रावसाहेब मुसळे, महादू ढोरके, गंगाराम उचाळे, बाळासाहेब निघोजकर, शांताराम जाधव, अनिल जाधव, मळीभाऊ खामकर, दत्तात्रय शिंदे आदी शिक्षक व वि्द्यार्थी उपस्थित होते.