लोणी काळभोर : जन्मजात अथवा नवजात शिशुंची हृदय दोष व हृदय रोगावरील उपचारासाठी पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. कारण हे उपचार आता लोणी काळभोर (ता. हवेली) माईर्स विश्वराज हॉस्पिटलमध्ये सुरु झाले आहेत. विश्वराजच्या डॉक्टरांनी हृदयाला छिद्र असलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर अवघड व गुंतागुंतीची यशस्वी शश्त्राक्रिया केली आहे. तसेच आता तिची प्रकृती ठणठणीत बरी आहे. अशी माहिती नवजात शिशु हृदयतज्ञ डॉ. आशिष बनपूरकर यांनी दिली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील माईर्स विश्वराज हॉस्पिटलमध्ये शनिवारी (ता. २१) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी वरील माहिती डॉ. आशिष बनपूरकर यांनी दिली आहे. यावेळी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुरज इंगोले, व्यवस्थापक तबरेज पठाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कातकडे, यशस्वी हृदय शश्त्राक्रिया झालेली विद्यार्थिनी, तिचे पालक व पत्रकार उपस्थित होते.
डॉ.आशिष बनपूरकर म्हणाले, पंढरपूर मध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीला जन्मजात हृदयाचा आजार होता. आजारामुळे तिला दम लागणे, घाम येणे, छातीत धडधड होणे हा त्रास सतत जाणवत होता. मोठ्या शहरात जाऊन उपचार करण्यास त्यांना भीती वाटत होती. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी चौकशी केल्यास उपचार आपल्याला परवडणार नाही अशी त्यांची मानसिक तयारी झाली होती.
दरम्यान,१६ वर्षाची विद्यार्थिनी हि ३ वर्षाची असताना तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तिला त्रास होत होता आणि अलीकडे तिला अत्यधिक घाम येणे व थकवा येणे अशा वारंवार समस्या येत होता. त्यामुळे नातेवाईकांना तिच्या आजाराची नेहमी काळजी असायची. ते तिच्यावर कोठे योग्य उपचार होतील. याची सतत चौकशी करीत असे.विश्वराज हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या हृदयरोगावर उपचार होतात. अशी माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना मिळाली होती. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी नवजात शिशु हृदयतज्ञ डॉ.आशिष बनपूरकर याची भेट घेऊन रुग्णास दाखविले.
विश्वराज हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीच्या तपासण्या करण्यात आल्या. डॉ. आशिष बनपूरकर यांना आजाराची पूर्ण कल्पना झाली व त्यांनी तिच्यावर ट्रान्सोफेजल इकोकार्डियोग्राफी (टीईई)करायचे ठरवले. इकोकार्डियोग्राफीमध्ये, मोठ्या आकाराचे सेप्टल डिफेक्ट (ASD) आढळले, ज्यामुळे रक्ताचा प्रवाह डाव्या बाजूने उजव्या बाजूला होत होता. तसेच, उजव्या बाजूच्या हृदयाच्या चेंबर्समध्ये दोष आढळला. याच कारणामुळे तिला सतत छातीची धडधड, घाम येणे हा त्रास जाणवत होता.
या स्थितीचा आढावा घेतल्यावर, आई वडिलांना पूर्ण माहिती देऊन त्यांच्या संमतीने, ती ट्रान्सोफेजल इकोकार्डियोग्राफी हि अद्यावत तपासणी करून घेतली. हि तपासणी केल्यानंतर रुग्णास शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. हे नातेवाईकांना (आई वडिलांना) समजवुन सांगितले व अगदि परवडेल अश्या अल्पदरात ही शस्त्रक्रिया होईल> अशी हमी दिली व रुग्णांच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करण्यास संमती दिली. आणि शस्त्रक्रियेचि तयारी करण्यात आली.
या शस्त्रक्रियेत 24 मिमी सेप्टल ऑक्लूडर वापरुन यशस्वी मोठ्या आकाराचे सेप्टल डिफेक्ट डिव्हाइस क्लोजर केले गेले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णास ताबडतोब अती दक्षता विभागात हलवण्यात आले व विश्वराज हॉस्पिटल मध्ये डॉ आशिष बनपूरकर यांच्यासोचत इतर तज्ञ डॉटरांनी लक्ष केंद्रित करून उपचार केले.
दुसऱ्या दिवशीच मुलीने तिच्या नियमित क्रियाकलापांना सुरुवात केली.
श्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे कौतुक
विश्वराज हॉस्पिटलच्या उत्कृष्ट सेवेसाठी तिच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केले आहेत. विश्वराज हॉस्पिटलने ग्रामीण भागात असून हि अद्यावत सुविधा येथे होत आहे. याची आम्हाला कल्पना नव्हती अशी टीप त्यांनी नमुद केली. ग्रामीण भागात उत्कृष्ट सेवा प्रदान केली आणि त्यामुळे नातेवाईकांना व समाजातील इतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.