Kondhva Crime : पुणे : चेकबुकवर बनावट सही करून पतीनेच पत्नीच्या खात्यावरून अपहार केल्याचा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरातून समोर आला आहे. कौटुंबिक कारणावरून पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर पतीने पत्नीच्या बॅक खात्यातून ५ लाख ८५ हजार रुपये काढत ही फसवणूक केली आहे.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Kondhva Crime) त्यावरून पती प्रिन्स सतिश सधोत्रा, सासू सोनिया सतिश सधोत्रा, सासरे सतिश कुमार सधोत्रा दीर पारस सधोत्रा, (सर्व रा. न्याती इथोस, उंड्री) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार महिला व त्यांचा पति प्रिन्स यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद होते. त्यातून सर्वांनी मिळून तक्रारदार महिलेला घराबाहेर काढले. यावेळी महिलेच्या बॅंकेचे चेकबुक घरातच होते. (Kondhva Crime) तेव्हा आरोपीने या चेकचा गैरवापर करत तक्रारदार यांनी बनावट सही करून त्यांच्या खात्यातून तब्बल ५ लाख ८५ हजार रुपये काढून घेऊन फसवणू केली. त्यानंतर हे पैसे सासु व सासरे यांच्या खात्यात वळवले. याबाबत त्यांनी पतीला विचारणा केली असता त्यांनी धमकी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यातील चांदणी चौक घेणार मोकळा श्वास ; उड्डाणपूल जुलैअखेर सुरू होणार
Pune News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानास सुरुवात; ८ तालुक्यातील ११ कामांना सुरुवात