लोणी काळभोर : सहा जणांच्या टोळक्याने दहशत माजवून एकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरा नगर परिसरात गुरुवारी (ता. 5) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. फिरोज शेख (रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिरोजला उपचारासाठी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस हवालदार संतोष होले, पोलीस हवालदार योगेश कुंभार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.