जुन्नर (पुणे) : जुन्नर येथील सय्यदवाडा येथे व्यवहाराविषयी बोलणे सुरु असताना झालेल्या वादातून रागाच्या भरात दगड फेकून मारला आहे. तो दगड तोंडावर पडल्याने एकाचे अकरा दात पडले आहेत.
वहमीदुल हसन मोहम्मद सय्यद (वय-42,रा. सय्यदवाडा, जुन्नर) असे जखमीचे नाव आहेत.
याबाबत वहमीदुल याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्नर पोलीसांनी फहद अकील शेख (रा. शिपाई मोहल्ला, जुन्नर) याच्या विरुद्ध विविध कलमान्वये बुधवारी (ता.22) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले आहे की, ही घटना शिपाई मोहल्ला येथे 15 मे रोजी रात्री घडली. आहे वहमीदुल व फहद हे शिपाई मोहल्ला येथील जाकीर हुसेन कारखान्याजवळ व्यवहाराविषयी बोलत होते.
त्यावेळी वहमीदुल याने, ‘आपण उद्या बसून बोलू व व्यवहार मिटवू’ असे सांगितले. त्यावर फहद याने, काय असेल तो आजच व्यवहार मिटून टाक असे सांगितले. त्यावरुन दोघांत वाद झाला. फहद हा शिवीगाळ व दमदाटी करु लागला. त्यावेळी लोकांनी त्यांची भांडणे सोडवली. त्यानंतर फहद याने दगड फेकून मारला. तो तोंडावर बसल्याने वहमीदुल याचे अकरा दात पडले. त्यानंतर उपचार केल्यानंतर त्याने तक्रार केली आहे.