बारामती, (पुणे) : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीच्या मनाविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी त्या तरुणीला धमकावले, तु इथून निघून जा नाहीतर तुला खोट्या केस मध्ये गुंतवीन अशी दमदाठी करून हाकलून दिल्याने तरुणाच्या वडिलांवरहि बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 7 जुलै 2022 ते 5 मे 2024 या वेळेत घडली आहे.
अक्षय विजय निगडे व त्याचे वडील विजय निगडे पुर्ण नाव माहित नाही (रा. जामदार रोड, बारामती, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 25 वर्षाच्या तरुणीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय विजय निगडे याने लग्राचे अमिष दाखवून तरुणीच्या इच्छे विरुध्द पाचगणी, महाबळेश्वर, बारामती येथे घेऊन जाऊन छेडछाड करुन जबरीने संबंधित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले व तिच्या मनाविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
लग्नाविषयी विचारले असता तुझ्याशी लग्र केले तर माझी समाजात काय इज्जत राहील असे म्हणुन अपमानित केले. तसेच वडील विजय निगडे यांनी तु येथुन जा आपण काय आहे ते बघू नाहीतर तुझ्यावरच केस करुन तुला खोट्या केस मध्ये गुंतविन अशी दमदाठी करून हाकलून दिले.
दरम्यान, याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय विजय निगडे व त्याचे वडील विजय निगडे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन जाधव करीत आहेत.