युनूस तांबोळी (शिरूर)
“जरी अनेक आपुले धर्म,
जरी अनेक आपुल्या जाती,
परी अंभग असू द्या
सदैव आपुली माणुसकीची नाती”.
ग्रामीण भागातील अर्थकारण हे वेगवेगळ्या कारणांमुळे सुधारत असते. वेगवेगळी संस्कृती व त्यावर विसंबून असणारा
व्यवसाय अर्थकारणाच जाळ पसरवितो. एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायावर अवलंबून असतो. त्यातून ग्राहक विक्रेता यांच्या
समन्वयाने देखील व्यवसाय वाढीस लागतात. कोरोनाने संपुर्ण बाजारपेठ बंद झाली होती. त्यातून व्यवसाय ठप्प झाल्याने
आठवडे बाजारातून देखील व्यवसायाला संधी मिळत नव्हती. दुकाने बंद यामुळे दररोजचा किराणा भरण्याइतकी पत नसल्याने अर्थव्यवस्थापडून कौटोंबिक परिस्थीती ढासळली होती.
ग्रामीण भागातून यात्रा,जत्रा, उत्सवातून मोठ्या प्रमाणात आर्थीक उलाढाल होत असते. देवदैवतांचे उत्सवावर बंदी आल्याने वर्षभराची
चंदी चार महिण्यात मिळणारे व्यवसाय ठप्प झाले. या व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली. सध्या यांत्रांवर बंदी उठल्याने
या व्यवसायीकांनी मरगळ झटकली असून ग्रामीण भागाची आर्थीक घडी सुधारावयाची असेल तर या व्यवसायीकांना प्रोत्साहन देणे
गरजेचे आहे.
सण,संस्कृती, उत्सव आणि व्यवसाय…
सण, संस्कृतीने ‘महाराष्ट्र’ राज्याला देशात आगळे वेगळे स्थान बहाल केले आहे. त्यातून नैसर्गीक बदलातून सण,
उत्सवांची केलेली आखणी ही देखील वैशिष्टपुर्ण आहे. इंग्रजी तारखेनुसार महिना बदलत असला तरी देखील तिथी व मराठी
महिण्याला देखील तेवढेच महत्व मिळवून दिले आहे. त्यानुसार हंगामी व्यवसाय करणारे व्यवसायीक ग्रामीण भागात मोठ्या
प्रमाणात पहावयास मिळतात. आषाढ व श्रावणात या व्यवसायीकांची लगबग जास्त पहावयास मिळते. कारण या काळात
निसर्गातल्या सानिध्याबरोबर सणांना महत्व दिले गेले आहे.
त्यातून महिलांसाठी असणारे उपवास, व्रताला मत दिले गेले आहे. दिवाळी असो की होळी लहान लहान व्यवसायीक पथारी
मांडून आपली आर्थीक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. वर्षभर वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून हे व्यवसायीक
आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत असतात. गेल्या दोन वर्षात दुकाने बंद, व्यवसाय करण्यासाठी एकत्र येण्यास बंदी आणि
त्यातून सण,संस्कृतीला तडा गेल्याचे दिसून आले.
यामुळे या काळात ‘दिवसा काबाडकष्ट अन रात्रीची चुल पेटणार ‘ अशा व्यवसायीकांची आर्थीक स्थिती बिघडली गेली. आता सर्व पुर्व पदावर येऊ पहात आहे. आता तरी या व्यवसायीकांना समाजातून व्यवसाय भरभराटीला येण्यास प्रोत्साहन देण्याचा मार्ग खुला होणे गरजेचे आहे.
फिरता व्यापारी आणि आठवडे बाजार…
कोरोना काळात लहान लहान व्यापार करणाऱ्याचे खूप हाल झाले.प्रपंच संभाळावयाचा असेल तर काहि तरी व्यवसाय करणे गरजेचे होते.त्यातून रस्त्यावर फिरण्यास बंदी होती. एकत्रीत येण्यास बंदी असल्याने पोलिस खात्यांच्या नियमाचा असणारा त्रास या फिरत्या व्यापाऱ्यांना झाला. त्यांची उपासमार पाहता या काळात वेगवेगळ्या संघटनानी पुढाकार घेतल्याचे चित्र आपून पाहिले आहे.
काही काळ का होईना या सर्वाना कुटूंबासाठी जेवनासाठी साधन सामुग्री मिळाली. आठवडे बाजार बंद यामुळे अनेक शेतकरी देखील खुप त्रासले गेले. भाजीपाला विकता आला तरी पाहिजे तेवढी आर्थीक उन्नती साधता आली नाही. एकंदर काय तर सर्वसामान्य माणुस हा कोरोना काळात त्रासला गेलेलापहावयास मिळाला.
सध्या कोरोनाची बंदी उठली असून गावागावात दैवदैवतांच्या यात्रा जत्रा सुरू झाल्या आहेत. लहान लहान व्यवसायीकांनी पुन्हा आपले
व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांना आपल्या प्रंपचाचा गाढा ओढण्यासाठी लागणारी साधन सामुग्री त्यांनी एकवटली आहे. त्यामुळे या उत्सवामधून त्यांची गर्दी पहावयास मिळू लागली आहे.
त्यामुळे यापुढील काळात अशा व्यवसायीकांना प्रोत्साहन दिल्यावर त्यांचे आर्थीक बळ सुधारेल. त्यातून त्यांची प्रगती होईल. असे काम समाजाने हाती घेतले पाहिजे. तेव्हा कुठे पुन्हा राज्यात भरभराठी येण्यास सुरूवात होईल. सध्या तरी हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे… असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना नंतर व्यवसायाची पुर्ण घडी विस्कटली होती. त्यातून बंदी हटली असली तरी व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात्रांमधून व्यवसायाला जागा मिळण्यासाठी तीन तीन दिवस अगोदर जाऊन प्रवेश हक्क संभाळावा लागतो. त्यातून व्यवसाय देखील पहिल्या सारखा होत नाही. यासाठी गाव पातळीव अशा व्यवसायीकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार व्हावा. त्यातून त्यांची व्यवसायाची भरभराटी होईल. असे नियोजन यात्रा कमेटींनी केली पाहिजे. दामू शेठ घोडे (माजी सरपंच – टाकळी हाजी,, ता. शिरूर)
लहान लहान व्यवसायीकांना समाजातून पाठबळ मिळाले पाहिजे. त्यातून त्यांची प्रगती झाल्यास अर्थकारणाला बळ मिळेल. अनेकवेळा चुली पेटविण्यासाठी यांची धडपड अयशस्वी होते. त्यामुळे असे कुटूंब चुकीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. त्यामुळे समाजात गुन्हेगारी वाढण्यास मदत होते. त्यासाठी यात्रा जत्रांमधून लहान लहान व्यवसायीकांना पाठबळ मिळणे गरजेचे आहे.
वैशाली चव्हाण (अध्यक्षा – तेजस्विनी फाऊंडेशन शिरूर)यात्रा जत्रांमधील खरे आकर्षण हे लहान लहान व्यवसायीकांच्या येण्यामुळे असते. वर्षात एकदाच मिळणारे हे मनोरंजन सुखदायक असते. त्यातून यात्रा जत्रांमधील उत्साह वाढत असतो. लहान लहान वस्तू खरेदी करून या कुटूंबाच्या चेहऱ्यावरचे समाधान मिळवले पाहिजे. त्यातून त्या गावच्या यात्रांना शोभा वाढवली जाईल. त्यामुळे यात्रांमधून लहान लहान व्यवसायीकांचे स्वागत होणे अपेक्षीत आहे. राजेंद्र गावडे (संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना शिरूर)
यात्रांचा काळ हा सर्वासाठी सुखावह असतो. वर्षातून एकदाच येणाऱ्या या यात्रांमध्ये मनोरंजनावर खर्च करण्यासाठी सगळेच तयार असतात. त्यनवीन कपडे, जेवनावळी तसेच वेगवेगळ्या खरेदी करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. त्यातून खर्च हा होतच असतो. लहान लहान व्यवसायीकांना आपन पाठबळ देऊन त्यांच्या वस्तू खरेदी केल्यावर त्यांच्यातही आनंदाचे वातावरण राहिल. मानसिंह पाचुंदकर (अध्यक्ष आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॅाग्रेस)