पुणे : वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळाल्याच्या अनेक घटना आपण वाचत, ऐकत असतो. नियमबाह्य वाहने चालविल्यामुळे महामार्गांवरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. अशातच आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. तर रिक्षाचालकांचीही मुजोरी वाढली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांना उघडा डोळे बघा नीट अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात रिक्षा, टेम्पो, बस यांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक रिक्षाचालक ड्रेस परिधान करत नाहीत. तसेच रिक्षा आणि बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. एका रिक्षा मालकाच्या एकाच परमीटवर 10 ते 20 रिक्षा चालविल्या जातात. प्रमाणापेक्षा जास्त घोडा मिटर ने रिक्षा चालवून अनधिकृत अर्थार्जन करतात.
अनेक वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वन वे किंवा रॉंग साईडने भरधाव वेगाने गाडी चालवितात. आडवळणी गाडी उभी करून चालक व त्यांचे तळीराम मित्र तेथेच दारू ढोसत बसतात. हल्ली वाहनांमध्ये डिजे लावण्याचे फॅड आले आहे. त्यामुळे हे चालक रूग्णालय किंवा शाळा बघत नाहीत. तर ते केवळ दान दान आवाज करत भरधाव वेगाने त्यांच्याच नादात निघून जातात.
वाहनांना बेकायदा प्रेशर होर्न बसवून सगळं ट्राफिक हादरवत फिरतात. कितीतरी वाहने कालबाह्य होऊन भंगारजमा झाल्या आहेत. आरटीओ पासिंग संपूनही रस्त्यावर मोठ्या थाटात धंदा केला जातो. परमीट विना लायसन्स 75% रिक्षा फक्त पुणे शहरात धंदा करत आहेत. ज्यावर सर्रास परप्रांतीय धंदे करून स्थानिक झाले आहेत. पोलिसांनाच अनधिकृत संघनेच्या धमक्या दिल्या जातात. तसेच अनधिकृत रिक्षा स्टँड रात्रीत स्थापण करतात. त्याचबरोबर एखाद्या खाऊ खुजाव राजकारण्याच्या हातून उद्घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात येते.
दरम्यान, वाहतूक पोलीसांनी रिक्षाचालकांची व अवैध प्रवासी करणाऱ्यांची मुजोरी ठेचून काढणे गरजेच बनले आहे. नाहीतर उद्या महाराष्ट्राचा बिहार होयला वेळ लागणार नाही. परप्रांतीय रिक्षा चालकांनी याची सुरुवातही केली आहे. गरीबाला त्रास न देता नियमबाह्य रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करून पोलिसांनी सद्रक्षणाय खलनिग्रनाय हे ब्रीद वाक्य सार्थक ठरवले पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून जोर धरू लागली आहे.
पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई कधी?
पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यात टेम्पो, ट्रक, रिक्षा व दुचाकी चालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
करताना दिसून येत आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कारवाईचा बडगा केव्हा उगारणार? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.