इंदापूर : महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये धोकादायक व विना परवना लावण्यात आलेले पाच होर्डिंगवर इंदापूर नगर परिषदेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. इंदापूर शहरातील बाबा चौक येथील इमारतेवरील 2 होर्डिंग, आय कॉलेज समोरील 2 व तहसील कार्यालयाशेजारील 1 होर्डिंग असे एकूण 5 होर्डिंग काढण्यात आले.
सदरची कारवाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सिटी इंजिनियर शिवदत्त भोसले, सीएलटीसी सिव्हिल इंजिनियर प्रसाद देशमुख, अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश सरवदे, आरोग्य विभाग मुकादम दत्तात्रय ढावरे तसेच आरोग्यविभागाचे व वीज विभागाचे सर्व कर्मचारी सहभागी होते.