पुणे : पुणे पेट्रोलियम विक्रेत्यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तेल कंपन्यांच्या अध्यक्षांसह तेल महामंडळाला दिला आहे. तेल कंपन्यांचे अध्यक्ष, तेल महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना सुमारे 3 आठवड्यांपूर्वी पत्र लिहिले होते. त्यामध्ये तेल महामंडळांनी सुधारात्मक कारवाई करून आणि टँकर चालविण्यासाठी व्यवहार्य दर देऊन इंधन माफिया नष्ट करण्याच्या मागण्या पुणे पेट्रोलियम विक्रेत्यांनी केल्या आहेत. परंतु त्यादृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.
तेल विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे की, हे लक्षात घेण्यासारखे आहे. की मागील 2-3 वर्षापासून संघटना तेल महामंडळांना दर महिन्याला वाढणारी इंधन चोरी आणि त्यामुळे डीलर्सना होणारे नुकसान, यावर आळा घालण्यासाठी नेहमीच पत्र लिहीत होती, परंतु सर्व आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पुणे तेल विक्रेत्यांनी दिला आहे. 900 डीलर्सनी हा कठोर निर्णय घेतला आहे.
पेट्रोल डीलर्स केवळ डीलर..
आम्ही तेल कंपन्यांकडून पुरविल्या जाणाऱ्या उत्पादनांची विक्री करू. सर्वसामान्यांची गैरसोय करण्याचा आमचा हेतू नाही, पण टर्मिनल्सवर लोडिंगसाठी आमचे स्वतःचे टँकर न पाठवण्यावर आम्ही ठाम आहोत. पुण्यातील 900 पंप आणि सातारा येथील 500 पंपांना उत्पादनांची पूर्तता आणि पुरवठा करण्याची जबाबदारी ही त्यांच्या पुरवठा साखळीद्वारे तेल कंपन्यांची असणार आहे. असं तेल विविक्रेत्यांचं म्हणणं आहे.